११ जून २०२४

बीजप्रक्रिया- उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक तंत्र

 



कृषि उत्पादनामध्ये बियाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे . अपेक्षित आधिक उत्पादन

मिळविण्यासाठी पेरणीसाठी वापरावयाचे बियाणे किड व रोगमुक्त असणे गरजेचे आहे . थोडक्यात

बियाण्याबददल् सांगावयाचे झाले तर असेल बियाणे दमदार तर पिक येईल जोमदार असे

सांगता येईल

बीजप्रक्रियेचे महत्व –

1.बियाणे व मातीमधून प्रसार होणा-या रोगावर नियंत्रण करता येते

2.बियाण्याची उगवणक्षता वाढते

3. अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते

4.जैविक खतांच्या प्रक्रियेमुळे जमिनीची सुपिकता वाढते

5.खत व पीक संरक्षणावरील खर्चात बचत होते

6.उत्पादनाची गुणवत्ता व उत्पादन वाढते.






1. रोगप्रतिकारक क्षमता: बीजप्रक्रिया केल्यामुळे बीयांना विविध रोगांपासून संरक्षण मिळते. यामुळे रोपांची आरोग्यदायी वाढ होते आणि उत्पादनामध्ये वाढ होते.


2. उत्पादन वाढ: बीजप्रक्रिया केल्याने बीयांची अंकुरणक्षमता वाढते. यामुळे अधिक संख्या आणि गुणवत्ता असलेली रोपे मिळतात, ज्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते.


3. मातीतील कीड नियंत्रण: बीजप्रक्रियेच्या माध्यमातून बीयांना मातीतील विविध कीडांपासून संरक्षण मिळते. यामुळे पिकांची वाढ निरोगी होते.


4. सिंचनाची गरज कमी: बीजप्रक्रिया केल्यामुळे बीयांची अंकुरणक्षमता वाढते, ज्यामुळे सिंचनाची गरज कमी होते. यामुळे पाण्याचा वापर कमी होतो आणि शेती अधिक शाश्वत बनते.


5. पर्यावरणास मदत: बीजप्रक्रियेमुळे कीटकनाशकांच्या वापरात घट होते, ज्यामुळे पर्यावरणाला होणारा त्रास कमी होतो.



बीजपक्रियेचे महत्वाचे टप्पे –



1.मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया – 


जेव्हा शेतकरी बाजरी किंवा भाताचे स्वत:कडील बियाणे पेरणीसाठी वापरतात तेव्हा ही प्रक्रिया केली जाते बाजरीवरील काणी रोग व भात पिकामधील

करपा रोग नियंत्रण तसेच न भरलेले रोगट पोल बियाणे काढून टाकण्यासाठी हि प्रक्रिया केली

जाते यामध्ये 3 टक्के मिठाच्या द्रावणाची 100 लिटर पाण्यात 3 किलो किंवा 300 ग्रॅम मीठ दहा लिटर

पाण्यात टाकून विरघळून घ्यावे व त्यामध्ये बियाणे टाकावे व ढवळावे द्रावण स्थिर झाल्यानंतर पोल

रोगट बियाणे पाण्याच्या वर तरंगते हे बियाणे काढून टाकावे व पाण्याखाली राहिलेले जड बियाणे दोन

ते तीनवेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत सुकवावे




2. बुरशीनाशकाची बीजप्रिक्रिया –


पिकावर येणारे विविध बुरशीजन्य रोग जसे की करपा आभायमय काजळी उदबत्या गोसावी मर इ रोगाच्या नियंत्रणासाठी तीन ग्रॅम थायरम किंवा

गंधक किंवा ॲग्रोसान जीवाणूजन्य करपा सारखे रोग असल्यास 1 ग्रॅम कार्बेन्डॅझीम प्रति

किलो बियाण्याला लावावे हि प्रक्रिया करताना बियाणे पोत्यावर पसरून त्यावर बुरशीनाशक

टाकावे व दोन्ही टोकाला दोघांनी धरून बियाणे ढवळावे . हाताचा संपर्क न येता ही प्रक्रिया पूर्ण

करावी.जैविक पध्दतीने बीजप्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा हे बुरशीनाशक 25 ग्रॅम किंवा द्रव

स्वरूपात असल्यास 25 मिली प्रति किलो बियाण्यास वापरावे


3. किटकनाशकाची बीजप्रक्रिया - 

बियाण्यामार्फत किंवा पेरणीनंतर बियाण्याला किंवा सुरूवातीच्या काळात पिकास किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन किटकनाशकाची

बीजप्रक्रिया केली जाते उदा . कापूस किंवा सोयाबीनवरील किडीच्या नियंत्रणासाठी

इमिडाक्लोप्रिड थायोमिथॉक्झाम किंवा कार्बोसल्फान अशा किटकनाशकाची बीजप्रक्रिया

केली जाते.


4. जैविक खते / जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया – 

हवेतील नत्र स्थिर करण्यासाठी स्फूरद विरघळणे पालाश गतीमान करणे झिंक विरघळविणे इ.साठी पिकाच्या प्रकारानुसार ॲझॅटोबॅक्टर

रायझोबियम पीएसबी इत्यादी जीवाणूसंवर्धक द्रवस्वरूपात असल्यास10 मिली किंवा पावडर

स्वरूपात असल्यास 25 ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास लावावे.


श्री यशवंत गव्हाणे (कृषी पर्यवेक्षक, सावंतवाडी)

सहाय्यक कृषी अधिकारी, परिवार

1 टिप्पणी:

  1. भात बियाणे पेरणीपूर्वी तीन टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया केल्यामुळे खरोखरच भाताचे पोचट बियाणे काढून टाकण्यास मदत होते.

    उत्तर द्याहटवा