बियाणे हा यशस्वी कृषि उत्पादनामधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. जगदगुरू संत तुकाराम
महाराजांचा शुध्द बीजीपोटी फळे रसाळ गोमटी हा अभंग सर्वाना माहित आहेच पण दुस-या एका
अभंगात तुकाराम महाराज म्हणतात निंबोनीच्या झाडा साखरेचे आळे बीज तैसी फळे येती तया.
यावरून लक्षात येते की बियाणे निवड चुकली ता पूर्ण हंगाम वाया जातो व प्रचंड आर्थिक नुकसानीला
सामोरे जावे लागते. त्यामुळे बियाणे खरेदी करताना खालील गोष्टींचा प्राधान्याने विचार करावा .
1. बियाण्याची खरेदी मान्यताप्राप्त कृषि सेवा केंद्र , खरेदी विक्री संघ , कृषि विद्यापिठ संशोधन केंद्रे
किंवा कृषि विभागाची तालुका बीजगुणन केंद्र यांचेकडूनच खरेदी करावी.
2. बियाणे खरेदी करताना विक्रेत्याकडून विहित नमुन्यातील पावती घ्यावी . पावतीवर बियाण्याचा
वाण , प्रकार ,कंपनी, लॉट नंबर , अंतिम मुदत , किंमत ,वजन इत्यादी बाबी व विक्रेत्याची सही
असावी. बियाणे खरेदीची पावती पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी ब-याचदा अनुदानासाठी
शेतकरी मूळ पावती देतात अश्या वेळेस पावतीची झेरॉक्स जपून ठेवावी.
3. बियाणे खरेदी करताना त्या पिकाचा सदर वाण आपल्या भागासाठी शिफारस आहे किंवा नाही याची
खात्री करावी शिफारस नसलेल्या वाणाचे बियाणे खरेदी करू नये.
4. बियाणे खरेदी करताना लागवड करावयाच्या जमिनीचा प्रकार उदा. हलकी मध्यम भारी याबरोबर
आपल्याकडे असणारी पाण्याची उपलब्धता याबरोबरच सदर वाण कोणत्या हंगामात लागवडीसाठी
शिफारस आहे याची खात्री करावी उदा भाताच्या बाबतीत वाण कालावधीनुसार वरकस , पाणथळ
यापैकी कोणत्या जमिनीसाठी योग्य आहे व आपली गरज काय आहे याचा विचार करावा.
5. बियाणे खरेदी करताना सिलबंद असलेलेच बियाणे खरेदी करावे बियाण्याच्या उत्पादनाचा दर्जा
किंवा टप्पायानुसार नुसार त्यावर टॅग आहे का याची खात्री करावी.पैदासकार बियाण्यास पिवळया
रंगाचा , पायाभूत बियाण्यास पांढ-या रंगाचा , प्रमाणित बियाण्याचा टॅग निळया रंगाचा व
सत्यतादर्शक बियाण्याचा टॅग फिकट हिरव्या रंगाचा टॅग असतो.
6. पेरणीपूर्वी बियाणे वापरताना बियाण्याची पिशवी सिल नसलेल्या बाजुने फोडावी व सिल टॅग व 100
ग्रॅम बियाण्यासह पिकाची कापणी होईपर्यत बियाण्यासह पिशवी जतन करून ठेवावी
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा