३० जून २०२४

पीक कीड रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप): शेतकऱ्यांचा मित्र

ब्लॉगर पोस्ट कॉपी प्रतिबंध
पीक कीड रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) हा महाराष्ट्र राज्यातील कृषी विभागाने सुरू केलेला एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या प्रकल्पाची सुरुवात २००९ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने हा प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना योग्य वेळी पीक कीड आणि रोगांविषयी माहिती देऊन त्यांचे नुकसान टाळणे आणि उत्पादनवाढ साधणे हा होता

कार्यपद्धती:

राज्यातील निवडक तालुक्यांमध्ये दर आठवड्याला कृषी पर्यवेक्षक आणि सहाय्यक निश्चित प्लॉटमध्ये पिकांची निरीक्षणे घेतात.

फेरोमोन सापळे आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून ते कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव तपासतात.

कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ या निरीक्षणांचे विश्लेषण करतात आणि दर सोमवारी आणि गुरुवारी ऑनलाईन संकेतस्थळावर तालुका निहाय उपाय योजना सुचवतात.

शेतकरी हे कृषी विभागाच्या मोबाईल ॲप द्वारे त्वरित माहिती मिळवू शकतात आणि त्यानुसार नियंत्रण उपाययोजना करू शकतात.

डेटा संकलन आणि विश्लेषण

केंद्रीय डेटा सेंटर: सर्वेक्षणाच्या नोंदी एका केंद्रीकृत डेटा सेंटरमध्ये पाठवण्यात येतात, जिथे त्यांचे विश्लेषण केले जाते. तज्ञ आणि वैज्ञानिक या डेटाचे सखोल विश्लेषण करतात.

तज्ञांचा सल्ला: विश्लेषणानंतर, तज्ञ शेतकऱ्यांना योग्य उपाययोजना सुचवतात. यात कीटकनाशकांचा वापर, जैविक नियंत्रण उपाय, आणि सुधारित शेती पद्धतींचा समावेश असतो.

सल्ला व मार्गदर्शन

एसएमएस आणि व्हॉट्सअ‍ॅप संदेश: शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सल्ला व सूचना दिल्या जातात. यामुळे त्यांना त्वरित आणि सोप्या पद्धतीने माहिती मिळते.

कृषी मेळावे आणि प्रशिक्षण: कृषी विभागाच्या तर्फे वेळोवेळी कृषी मेळावे आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जातात. यात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, पद्धती, आणि कीड व्यवस्थापन उपाययोजनांची माहिती दिली जाते.

शपातळीवर नावाजला गेलेला प्रकल्प

क्रॉपसॅप प्रकल्पाने आपल्या कार्यक्षमता आणि यशामुळे राष्ट्रीय पातळीवर मोठी प्रशंसा मिळवली आहे. याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य माहिती मिळाल्यामुळे त्यांची पीक उत्पादनक्षमता वाढली आहे. याशिवाय, कीड आणि रोगांचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.

नॅशनल एग्रीकल्चर इनोव्हेशन प्रोजेक्ट: या प्रकल्पाला नॅशनल एग्रीकल्चर इनोव्हेशन प्रोजेक्टच्या अंतर्गत गौरवण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अन्य राज्यांमध्ये अनुकरण: महाराष्ट्राच्या यशस्वी प्रकल्पाच्या आधारे इतर राज्यांनीही आपापल्या पातळीवर असेच प्रकल्प सुरू केले आहेत. यामुळे राष्ट्रीय स्तरावर कृषी उत्पादनक्षमता वाढली आहे.

२९ जून २०२४

शेतकरी मासिक: 1965 पासून शेतकऱ्यांचा विश्वासू मित्र




श्री यशवंत गव्हाणे (कृषी पर्यवेक्षक, सावंतवाडी)
सहाय्यक कृषी अधिकारी, परिवार

सन १९६५ पासून कृषी विभागामार्फत   शेतक-यांच्या सेवार्थ दरमहा प्रसिध्द करण्यात येत असून या मासिकामध्ये कृषी विद्यापीठाचे तज्ञ आणि कृषी व संलग्न खात्याचे अधिकारी यांचे लेख तसेच कृषी क्षेत्रात काम करणा-या संस्था आणि कृषी क्षेत्रातील प्रगतशील शेतकरी यांच्या यशोगाथा प्रसिध्द करण्यात येतात. बदलत्या काळाची गरज ओळखून शेतीसंबंधी इतर पुरक व्यवसाय, बाजार व्यवस्थापन, कृषीप्रक्रिया, निर्यातक्षम शेतीसाठी महत्वाचे निकष, राष्ट्रीयकृत बँका मार्फत  देण्यात येणाऱ्या सुविधा/ मदती बाबतची माहिती तसेच कृषी व संलग्न विभागाच्या विविध योजना इत्यादी माहिती प्रसिध्द करण्यात येते. राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषीविषयक झालेले संशोधन वेळोवेळी या मासिकाच्या माध्यमातून दरमहा उपलब्ध करुन देण्यात येते.




मासिकाची वर्गणी:

शेतकरी मासिकाची वार्षिक वर्गणी रुपये ४००/तर द्विवार्षिक वर्गणी रूपये ८००/-  राहील  तर किरकोळ अंकाची किंमत  कपये ३५  आहे .मासिकाची वार्षिक व्दिवार्षिक वर्गणी रक्कम शेतकरी मासिक कार्यालयात रोखीने भरता येणार नाही. वर्गणीची रकम क्षेत्रीय कार्यालयाकडून कोषागार चलनाने किंवा  ग्रास प्रणालीमार्फतच स्वीकारली जाते तसेच वैयक्तिक शेतकरी वर्गणी मनीऑर्डरव्दारे शेतकरी मासिक कार्यालयास पाठवू शकतात. 

सन २०१३-१४ बा वर्षापासून संगणकीय ग्रासप्रणालीतून (Government Receipts Accounting System- GRAS) महसूल जमेची

रक्कम  ऑनलाईन पध्दतीने भरण्याची कार्यपध्दती विकसित करण्यात आली आहे. ऑनलाईन पध्दतीने वर्गणी भरताना पुढील प्रमाणे वर्गणी भरता येते.


1. Intermet Banking (नेट बैंकिंग) अथवा डेबिट व क्रेडीट कार्ड मार्फत

2. Accross Bank Counter सर्व बँक , चलन बँकेत भरायचे असल्यास पर्याय निवडावा

3. UPI ने भरायचे असल्यास UPI ID टाकून वर्गणी भरता येईन, उदा. Phone Pay, Google Pay



त्यानुसार वर्गणीदारांनी GRAS प्रणालीव्दारे वर्गणी  भरणा करून चलनाची प्रत व पत्त्यांची वावी पिनकोड सह शेतकरी मासिक कार्यालयास agrishetkari@gmail.com या ईमेल-आयडीवर अथवा पोस्टाने  पाठवावी 

 कार्यालयाचा पत्ता-शेतकरी मासिक, समिती सभागृह दूसरा मजला, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे ४११००५) पाठवावी  कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना संबंधित वर्गणीदाराने त्यांचा सभासद क्रमांक व वर्गणीचा कालावधी नमूद करणे आवश्यक राहील, तसेच कोषागार चलनाची मुळप्रत पाठवणे .वर्गणीदार होण्यासाठी शेतकरी मासिक अंकाच्या मनावरील QR कोड Scan करावा .

जाहिरात -

शेतकरी मासिकामध्ये शासकीय स्वरुपाच्या जाहिराती स्विकारण्यात येतात. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत जाहिराती प्राप्त झाल्यास पुढील महिन्याच्या अंकामध्ये प्रसिद्धीसाठी सदरच्या जाहिरातींचा समावेश करण्यात येईल, तसेच जाहिरात देण्यापूर्वी शेतकरी मासिक कार्यालयास (०२०-२५५२७३३१) या दूरध्वनीवर संपर्क साधावा, जाहिरातीचे आर्टवर्क आकारानुसार पी.डी.एफ. फॉरमॅट मध्ये agrishetkari@gmail.com या इ-मेल वर पाठवावे शासनाने शेतकरी मासिकामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे दर निश्चित केलेले आहेत


#शेतकरीमासिक #कृषी #शेती #महाराष्ट्र #भारत #कृषीविज्ञान #तंत्रज्ञान #यशस्वीशेती #किसान #अन्नधान्य #उत्पन्न #बाजारपेठ #जाहिरात

२८ जून २०२४

कीड आणि रोग नियंत्रणाच्या विविध पद्धती









NDVI: वनस्पतींच्या आरोग्याचा अंदाज लावणारे उपग्रह तंत्रज्ञान

 


NDVI (Normalized Difference Vegetation Index), म्हणजे नॉर्मलाइज्ड डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स, हे एक उपग्रह रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान आहे जे पृथ्वीवरील वनस्पतींच्या प्रमाण आणि आरोग्याचे मोजमाप करते. NDVI हा उपग्रह प्रतिमा किंवा हवाई प्रतिमांचा वापर करून वनस्पतींच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी विकसित केलेला एक निर्देशांक आहे.

NDVI कसे कार्य करते?

प्रकाशाचा परावर्तन: सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचतो तेव्हा त्यातील काही भाग वनस्पतींनी शोषला जातो आणि काही भाग परावर्तित होतो. निरोगी वनस्पती NIR प्रकाशाचा मोठा भाग परावर्तित करतात, तर दृश्यमान लाल प्रकाश शोषून घेतात. तण, रोगग्रस्त वनस्पती आणि जमिनीचा भाग कमी NIR प्रकाश परावर्तित करतात आणि अधिक दृश्यमान लाल प्रकाश परावर्तित करतात.

NDVI मध्ये NIR आणि RED चा वापर:

NIR (जवळ-अवरक्त) आणि RED (दृश्यमान लाल) हे दोन महत्त्वपूर्ण तरंगलांबी आहेत जे वनस्पतींच्या आरोग्याचे मोजमाप आणि पृथ्वीवरील वनस्पतींचे निरीक्षण करण्यासाठी NDVI (नॉर्मलाइज्ड डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स) सारख्या उपग्रह रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानात वापरले जातात.

NIR (जवळ-अवरक्त):
तरंगलांबी: 700 ते 1000 नॅनोमीटर
वर्ण: मानवी डोळ्यांना दिसत नाही
वनस्पतींचा प्रतिसाद: निरोगी वनस्पती NIR प्रकाशाचा मोठा भाग परावर्तित करतात, तर तण, रोगग्रस्त वनस्पती आणि जमिनीचा भाग कमी NIR प्रकाश परावर्तित करतात.
उपयोग: वनस्पतींच्या प्रमाण आणि आरोग्याचे मोजमाप, पाणी तणाव, वनस्पतींच्या वाढीचा मागोवा घेणे.

RED (दृश्यमान लाल):
तरंगलांबी: 620 ते 750 नॅनोमीटर
वर्ण: लाल रंग
वनस्पतींचा प्रतिसाद: वनस्पती लाल प्रकाशाचा मोठा भाग शोषून घेतात, तर NIR प्रकाश परावर्तित करतात.
उपयोग: वनस्पतींच्या वर्णद्रव्य (क्लोरोफिल) च्या प्रमाणाचा अंदाज, वनस्पतींच्या तणावाचे मोजमाप.

आरोग्यदायी वनस्पती:

रेड (लाल) लहरी: आरोग्यदायी वनस्पती या लहरींचे कमी परावर्तन करतात. याचे कारण असे की वनस्पतींमध्ये असलेला क्लोरोफिल लाल प्रकाश शोषून घेतो.
नियर-इन्फ्रारेड (जवळील-अवरक्त) लहरी: आरोग्यदायी वनस्पती या लहरींचे जास्त परावर्तन करतात. यामुळे पानांची संरचना या लहरींचे परावर्तन करते.

खराब किंवा मृत वनस्पती:


रेड (लाल) लहरी: खराब किंवा मृत वनस्पती या लहरींचे कमी परावर्तन करतात कारण त्यांच्यात क्लोरोफिलची कमतरता असते.
नियर-इन्फ्रारेड (जवळील-अवरक्त) लहरी: खराब किंवा मृत वनस्पती या लहरींचेही कमी परावर्तन करतात कारण पानांची संरचना खराब झालेली असते.

NDVI तंत्रज्ञानाची प्रक्रिया

1. डेटा संकलन:
उपग्रह किंवा ड्रोन: उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा गोळा करण्यासाठी उपग्रह किंवा ड्रोनचा वापर केला जातो.
स्पेक्ट्रल मोजमाप: या प्रतिमा रेड आणि जवळ-अवरक्त (NIR) तरंगलांबीमधील प्रकाशाचे परावर्तन मोजतात. निरोगी वनस्पती NIR प्रकाशाचा मोठा भाग परावर्तित करतात आणि लाल प्रकाश शोषून घेतात, तर तण, रोगग्रस्त वनस्पती आणि जमिनीचा भाग कमी NIR प्रकाश परावर्तित करतात आणि अधिक लाल प्रकाश परावर्तित करतात.

2. डेटा प्रक्रिया:
कॅलिब्रेशन: उपग्रह किंवा ड्रोन सेन्सरची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी कॅलिब्रेशन डेटा वापरला जातो.
एट्मोस्फेरिक सुधारणा: वातावरणाचा डेटावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी डेटा सुधारित केला जातो.
NDVI गणना: NDVI सूत्र NIR आणि RED मधील प्रतिबिंबांमधील फरक मोजून आणि नंतर त्यांचे गुणोत्तर काढून मिळवले जाते.  NDVI सूत्र खालीलप्रमाणे आहे:
(NIR - RED) / (NIR + RED)
ज्यामध्ये:
NIR = जवळ-अवरक्त प्रतिबिंब
RED = लाल प्रतिबिंब

3. मूल्यांकन:
NDVI नकाशे: NDVI मूल्यांचा वापर वनस्पतींच्या आरोग्याचे नकाशे तयार करण्यासाठी केला जातो.
व विश्लेषण: वेळेनुसार NDVI मूल्यांचे विश्लेषण करून वनस्पतींच्या वाढीचा मागोवा घेतला जाऊ शकतो.
अनुप्रयोग: NDVI डेटा शेती, वनस्पतीशास्त्र, जलसंधारण, हवामानशास्त्र आणि भूगोल यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये वापरला जातो.

4. व्याख्या: NDVI मूल्ये -1 ते 1 पर्यंत असू शकतात:
-1: जमीन किंवा पाणी दर्शवते.
0: वनस्पतींची कमतरता दर्शवते.
0.2 ते 1: निरोगी वनस्पतींचे प्रमाण वाढते.

NDVI चा फायदा:

मोठ्या क्षेत्राचे त्वरित आणि कार्यक्षम मूल्यांकन.
वेळेनुसार वनस्पतींच्या आरोग्यातील बदल मागोवा घेणे.
दुर्गम भागांमधील वनस्पतींच्या अभ्यासासाठी उपयुक्त.
अन्न सुरक्षा, पर्यावरणीय व्यवस्थापन आणि हवामान संशोधनात महत्त्वपूर्ण भूमिका.

२६ जून २०२४

तुर लागवड तंत्रज्ञान दिन









२५ जून २०२४

शंखी गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन



मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यातील लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांसह अनेक भागात शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सोयाबीन, कापूस यांसारख्या पिकांमध्ये रोपावस्थेतच गोगलगायींचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठे नुकसान होते. त्यामुळे या किडीवर सामूहिकरीत्या एकात्मिक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शंखी गोगलगाय ओळख:

शंखी गोगलगाय (स्नेल) हा प्राणी मोल्युस्का या मृद्‍काय गटातील असून, गॅस्ट्रोपोडा (उदरपाद) वर्गात समाविष्ट आहे. मोल्युस्का हा कीटकानंतर संख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा प्राणिवर्गीय गट आहे. मागील खरीप हंगामात आढळलेली शंखी गोगलगाय ही आफ्रिकन जॉइंट स्नेल (शास्त्रीय नाव: अचेटिना फुलिका) आहे. जगात अंदाजे ३५,००० पेक्षा जास्त गोगलगायीच्या प्रजाती असून, भारतात १,४५० प्रजातींची नोंद आहे. या किडीचे उगम स्थान पूर्व आफ्रिका आहे. भारतामध्ये गोगलगायींचा प्रसार सर्वप्रथम १८४७ मध्ये पश्चिम बंगालच्या कोलकात्यात झाला आणि तिथून तिचा प्रसार महाराष्ट्रासह एकूण १२ राज्यांमध्ये झाला. आंतरराष्ट्रीय निसर्ग व नैसर्गिक स्रोत संवर्धन संघटनेने (IUCN) गोगलगायींचा समावेश जगातील शंभर सर्वात जास्त उपद्रवी किडींच्या प्रजातींमध्ये केला आहे.

शंखी गोगलगाय ओळख:

शंखी गोगलगायीच्या पाठीवर ४ ते ५ इंच (१० ते १२ सेंमी) लांबीचे ७-९ चक्र असलेले गोलाकार टणक असे कवच (शंख) असते. सरासरी वजन ३२ ग्रॅमपेक्षा जास्त, बहुतांशी शंखी गर्द, करडा, फिक्कट किंवा हिरवा काळपट रंगाच्या असतात.

प्रजनन आणि जीवनक्रम:

शंखी गोगलगायी (अचेटिना फ्युलिका) उभयलिंगी असतात. दोन गोगलगायींचे मिलन झाल्यास दोन्ही गोगलगायी अंडी देतात. एक मोठी आणि दुसरी लहान गोगलगाय यांचे मिलन झाल्यास फक्त मोठी गोगलगाय अंडी देते. यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते. गोगलगायांची जीवनक्रम तीन अवस्थांमध्ये होतो: अंडी, पिले आणि प्रौढ. मिलनानंतर ८-२० दिवसांनी गोगलगाय ओलसर जमिनीमध्ये २०० अंडी देते. एका वर्षात ती ५-६ पुंजके घालते. पहिल्या वर्षी एक गोगलगाय १००, तर दुसऱ्या वर्षांपासून ५०० पर्यंत अंडी घालते. अंडी ४.५-५.५ मिमी व्यासाची असतात. २४-२८ अंश सेल्सिअस तापमानात एक-दोन आठवड्यांत लहान गोगलगायी बाहेर पडतात. ५-६ महिन्यांत प्रौढ होऊन मिलनास प्रारंभ करतात. त्यांचे आयुष्यमान ५ ते ६ वर्षे असते.

अधिवास आणि पोषक वातावरण:

गोगलगायी साधारणतः निशाचर असल्या तरी ढगाळ व आर्द्रतायुक्त वातावरणात दिवसाही सक्रिय असतात. ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि ९ ते २९ अंश सेल्सिअस तापमानात संख्या झपाट्याने वाढते. सूर्यप्रकाशापासून दूर झाडझाडोऱ्यांच्या आडोशाला सावलीत, पाण्याजवळ थंड व ओलसर जमिनीत गोगलगायींचा अधिवास असतो. हिवाळ्यामध्ये त्या जमिनीमध्ये सुप्तावस्थेत जातात.

गोगलगाय व्यवस्थापन उपाय:

१) प्रतिबंधात्मक उपाययोजना:

- उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी, ज्यामुळे गोगलगायी सुप्तावस्थेतून बाहेर येऊन नष्ट होतील.

- दिवसा लपलेल्या गोगलगायी जमा करून नष्ट कराव्यात.

- हंगामातील पहिला पाऊस पडल्यानंतर सामूहिकरीत्या गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात.

- शेताच्या बांधाजवळ तंबाखू भुकटी, कोरड्या राखेचा अथवा चुन्याचा पट्टा आखावा.

२) नियंत्रणात्मक उपाययोजना:

- संध्याकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात.

- शेतात ७-८ मीटर अंतरावर वाळलेले गवत किंवा भाजीपाल्याच्या अवशेषाचे ढीग ठेवावेत किंवा ओल्या गोणपाटावर आंबट गोड वासासाठी गुळाचे पाणी, फळांचे राहिलेले अवशेष, उसाची मळी,कोबी अथवा पपईची पाने बारीक करून ठेवावीत. त्याकडे आकर्षित झालेल्या गोगलगायींवर तंबाखूचा अर्क ५ लिटर (२५० ग्रॅम तंबाखू भुकटी ७.५ लिटर पाण्यात उकळून ५ लिटर तयार झालेले द्रावण) + कॉपर सल्फेट म्हणजेच मोरचूद द्रावण ५ लिटर (३०० ग्रॅम कॉपर सल्फेट ५ लिटर पाण्यात) असे एकूण १० लिटर द्रावण फवारावे. लहान शंखीच्या नियंत्रणासाठी १० टक्के मिठाची फवारणी करावी.

- जास्त तापमान व कमी आर्द्रता असलेल्या स्थितीमध्ये मेटाल्डिहाइड हे गोगलगायनाशक प्रभावी ठरते. सोयाबीन व कापूस यासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड २ किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे. तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाइड प्रति झाड १०० ग्रॅम पसरून टाकावे. मेटाल्डिहाइड या गोगलगाय नाशकाचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.

- आर्द्रता जास्त असताना मेटाल्डिहाइडला पर्याय म्हणून आयर्न फॉस्फेटचा वापर २ किलो प्रति एकर या प्रमाणे आमिष म्हणून वापरता येते. आयर्न फॉस्फेटच्या संपर्कात आल्यास गोगलगायी उपाशी राहून मरतात. मात्र स्पिनोसॅड ४ मिलि प्रति २ किलो आयर्न फॉस्फेटमध्ये मिसळून वापरल्यास अधिक परिणामकारक ठरते. आयर्न फॉस्फेट हे पाळीव प्राणी व इतर प्राण्यांना सुरक्षित आहे

शंखी गोगलगाय नियंत्रणासाठी वरील सर्व उपाययोजना एकत्रितपणे राबवणे गरजेचे आहे, त्यामुळे या उपद्रवी किडीचे नियंत्रण करता येईल आणि पिकांचे नुकसान टाळता येईल.



सोयाबीन पिकावरील शंखी गोगलगाय किड



सोयाबीन पिकाची कोवळी पाने खाताना शंखी गोगलगाय

 

लेखन:
श्री. सुहास पंके (शास्त्रज्ञ कृषी विस्तार, कृविके अंबाजोगाई)
डॉ. वसंत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृविके अंबाजोगाई)
श्री. किशोर भिसे (प्रक्षेत्र व्यवस्थापक, कृविके अंबाजोगाई) 

२३ जून २०२४

सोयाबीन अष्ट सुत्री









'हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञान प्रसार दिन'









पावसाळ्यात पशुधनाची काळजी: एक शास्त्रीय दृष्टीकोन

  


श्री. सुहास कृ. पंके 

(कृषी विस्तार शास्त्रज्ञ , कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई)

पावसाळा हा वर्षातील एक महत्त्वाचा हंगाम असला तरी, पशुधनासाठी अनेक आव्हाने घेऊन येतो. ओलसर आणि दमट हवामान, रोगांचा प्रादुर्भाव, चारा आणि स्वच्छ पाण्याची कमतरता, आणि गोठ्यातील स्वच्छतेची समस्या यासारख्या अनेक गोष्टी पशुधनाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात. म्हणूनच, पावसाळ्यात पशुधनाची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.


पावसाळ्यात उघड्यावरील पशुधन


पशुधनाची आरोग्य:

  • लसीकरण: पावसाळ्यात होणाऱ्या अनेक रोगांपासून पशुधन वाचवण्यासाठी लसीकरण हा एक उत्तम उपाय आहे. वेळेवर आणि योग्य लसीकरण देणे आवश्यक आहे.
  • आहार व्यवस्थापन: पावसाळ्यात चाऱ्याची उपलब्धता कमी असू शकते. त्यामुळे, पशुधनाला पौष्टिक आणि संतुलित आहार देणे आवश्यक आहे. हिरव्या चाऱ्यासोबतच, कडधान्य आणि खनिज मिश्रण यांचा समावेश करावा.
  • रोग प्रतिबंध: पशुधनाची नियमितपणे तपासणी करून आजारांचा लवकर शोध घेणे आणि योग्य उपचार करणे आवश्यक आहे.
  • गोठ्याची स्वच्छता: गोठा स्वच्छ आणि कोरडा ठेवणे आवश्यक आहे. नियमितपणे गोठा स्वच्छ करा आणि पाणी साचू नये याची काळजी घ्या.
  • पाण्याची उपलब्धता: स्वच्छ आणि ताजे पाणी नेहमी उपलब्ध असणे आवश्यक आहे.
पशुधनासाठी सुरक्षित निवारा
पशुधनासाठी सुरक्षित निवारा


पशुधन व्यवस्थापन:

  • प्रजनन व्यवस्थापन: पावसाळ्यात पशुप्रजनन टाळणे चांगले. जर प्रजनन करायचे असेल तर, योग्य पशु निवडणे आणि त्यांची चांगली काळजी घेणे आवश्यक आहे.
  • कामाचा ताण कमी करणे: पावसाळ्यात पशुंना जास्त कामाचा ताण देऊ नये.

पशुधन उत्पादनाचे संरक्षण:

  • दुग्ध व्यवस्थापन: पावसाळ्यात दुधाची गुणवत्ता कमी होऊ शकते. त्यामुळे, स्वच्छता आणि दुध काढण्याच्या पद्धतीमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे.
  • मांस उत्पादन: पावसाळ्यात मांस उत्पादनात घट होऊ शकते. चांगल्या आहार व्यवस्थापनाने आणि योग्य पशु निवडीने या समस्येवर मात करता येते.
  • उन आणि पाऊस: पशुंना उन्हापासून आणि पावसातून बचाव करण्यासाठी योग्य निवारा उपलब्ध करून द्या.

शेवटी:

पावसाळ्यात पशुधनाची योग्य काळजी घेणे हे केवळ पशुंच्या आरोग्यासाठीच नाही तर शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठीही आवश्यक आहे. वरील टिपा आणि शास्त्रीय दृष्टिकोनाचा अवलंब करून आपण पावसाळ्यात तुमच्या पशुधनाची उत्तम काळजी घेऊ शकता आणि चांगले उत्पादन मिळवू शकता.

 

संकलन व लेखन: श्री. सुहास कृ. पंके (कृषी विस्तार शास्त्रज्ञ , कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई)