खरीप हंगाम हा भारतातील शेतीसाठी एक अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे. या हंगामात पिकांची योग्य लागवड करण्यासाठी पूर्व मशागत करणे आवश्यक आहे. योग्य पूर्व मशागत केल्याने मातीची गुणवत्ता सुधारते, पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते.
1. माती परीक्षण
माती परीक्षण हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये मातीची पोत, पीएच , जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्य आणि इतर आवश्यक घटकांची माहिती मिळते. माती परीक्षणाच्या आधारे खते आणि भू सुधारकांची योग्य मात्रा ठरवता येते.
2. नांगरट
नांगरट म्हणजे मातीचे खोदणे आणि ती उलटवणे. यामुळे मातीच्या वरच्या थरातील गवत, तण आणि इतर अवांछित घटक नष्ट होतात. शेतामध्ये आडवी उभी नांगरट केल्याने जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते. पावसाच्या पूर्वी उताराला आडवी नांगरट करावी त्यामुळे पावसाचे पाणी शेतात अडवण्यास मदत होईल.
माती परीक्षण: शेतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण
3. शेत उन्हात तापू देणे
नांगरट केल्यानंतर शेताला काही काळ उन्हात तापू द्यावे . यामुळे मातीतील ओल कमी होते आणि हानिकारक किटक आणि रोगाणू नष्ट होतात.
4. मातीची गुणवत्ता सुधारणे
मातीचा पोत कंपोस्ट, शेणखत , निंबोळी पेंड यांसारख्या जैविक खतांचा वापर करून मातीची सुपीकता वाढवता येते. याशिवाय, मातीमध्ये हिरवळीच्या खतांच्या समावेश केल्यास ती अजून सुधारते.
5. बांधाची निगा
जमिनीचे धूप आणि पाण्यापासून संरक्षण: बांध मातीचे धूप आणि पाण्यापासून क्षरण रोखतात, ज्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि पिकांची वाढ होते.
पाणी साठवण: बांध पाणी अडवून ठेवतात. बांधामुळे पावसाळ्यातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो आणि दुष्काळात सिंचनासाठी पाणी पुरवठा होतो.
6. जमीन सपाटीकरण
शेताच्या समतलतेमुळे पाण्याचे योग्य प्रमाणात निचरा होते आणि पिकांना समान प्रमाणात अन्नद्रव्य व पाणी मिळते. शेत समतल करण्यासाठी लेव्हलर चा वापर केला जाऊ शकतो.
7. तण व्यवस्थापन
पूर्व मशागतीच्या वेळी तण नष्ट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तणांमुळे पिकांच्या वाढीत अडथळा येतो आणि पाण्याचे शोषण कमी होते.
फायदे
- मातीची गुणवत्ता सुधारते.
- पिकांची वाढ चांगली होते.
- उत्पादनात वाढ होते.
- रोग आणि किटकांचा प्रादुर्भाव कमी होतो.
- पाण्याचे व्यवस्थापन चांगले होते.
शेतीची पूर्व मशागत योग्य प्रकारे केल्यास खरीप हंगामात उत्तम पीक उत्पादन मिळवता येते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेताची पूर्व मशागत काळजीपूर्वक करावी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा