यशवंत आप्पासाहेब गव्हाणे
एम. एस्सी ( ॲग्री)
कृषि पर्यवेक्षक सावंतवाडी
महाराष्ट्र शासन कृषि विभाग
भारत हा कृषि प्रधान देश आहेच . बहुतांश जनतेचे उपजीविकेच साधन व सर्व लोकांचे अन्नधान्य पुरवठा हा फक्त कृषि क्षेत्रातुनच होतो. कोव्हिड कालखंडात सर्व जगाने अनुभवले आहे की आरोग्य वगळता इतर बहुतांश सर्व क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाले होते फक्त शेतकरी व कृषि उत्पादन व पुरवठा अविरतपणे चालु होता..
वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवठा –
देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे वाढत्या लोकसंखेस पौष्टीक व सकस अन्नधान्य पुरवठा करणे अत्यंत महत्वाचे
आहे.
जमिनीचे आरोग्य सुधारणा-
गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राचे प्रत्येक महसुली
गावातील माती नमुने काढून सदर गावाची आरोग्य पत्रिका तयार केली आहे व हे आरोग्य पत्रिका
गावांमध्ये प्रसारित केली आहे या आधारे शेतकऱ्यांना आपल्या पिकानुसार किती खत द्यावे
याबद्दल माहिती मिळत आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांमधून वैयक्तिक शेतकऱ्यांना माती
परीक्षण करून मोफत आरोग्य पत्रिका वितरित केली जात आहे.
यामुळे खताचा गरजेनुसार, सुयोग वापर होत आहे .अनावश्यक खत वापर व खतावरील होणारा खर्च टाळला जात आहे. मुख्य अन्नद्रव्या बरोबरच दुय्यम अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्य वापराबद्दल शेतकऱ्यांमध्ये जाग्रृती केली जात आहे व वापराबाबत माहिती दिली जात आहे व त्याचा वापर होत आहे. जमिनीच्या आरोग्य सुधारण्यामध्ये रासायनिक खताबरोबरच विविध प्रकारची सेंद्रिय हिरवळीचे खते जैविक खते यांचाही वापर वाढलेला आहे यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढत आहे.
सुधारित तंत्रज्ञान
गेल्या काही
वर्षांमध्ये तंत्रज्ञानामध्ये अमुलाग्र बदल
झालेला आहेव संशोधन झालेले आहे यामध्ये प्रामुख्याने
ड्रोन चा वापर सुदूर संवेदन प्रणालीचा वापर याद्वारे की रोग सर्वेक्षण व पिकावर फवारणी
यासाठी केला जात आहे तसेच पीक तंत्रज्ञानामध्ये सेंसर च्या वापरामुळे पिकाला आवश्यक
असणारे पाणी अन्नद्रव्य यांचा पुरवठा गरजेनुसारच होत आहे व हे काम सोपे झाले आहे.
पाणी व्यवस्थापन-
पाणी व्यवस्थापन या बाबींमध्ये महाराष्ट्र व देशांमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे यामध्ये सिंचनासाठी शेततळे खोदणे तसेच उपलब्ध पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी ठिबक सिंचन , तुषार सिंचन इत्यादी सिंचन पद्धतीचा व आच्छादनाचा वापर करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमपणे वापर केला जात आहे यापूर्वी पिकाला पाणी देताना मोकाट पद्धतीने पाणी दिले जात होते यामुळे पिकांना गरजेपेक्षा जास्त पाणी देऊन जमिनीचे आरोग्य बिघडले जात होते तणांचा व किड रोगांचे प्रमाण जास्त असायचे जमिनीत क्षारपड होत होत्या व पाण्याची टंचाई जाणवत होती ते प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.
पिकांचे
सुधारित व संकरित वाण -
गेल्या दशकामध्ये अन्नधान्य ,तृणधान्य, गळीत धान्य,फळ पिके , भाजीपाला पिके, फुल पिके इत्यादी विविध पिकांच्या सुधारित संकरित जाती विकसित झालेल्या आहे. सध्या विकसित केल्या जात असणाऱ्या जातीमध्ये फक्त अधिक उत्पादन देणे हेच ध्येय नसून ती जात प्रतिकूल वातावरणाला तग धरू शकणारी किडी रोगाला प्रतिकार करणारी तसेच त्या जातीमध्ये अधिक पौष्टिकता असेल तरच वाण प्रसारित करायला परवानगी दिली जात आहे त्यामुहे असे संशोधन सध्या राज्य व देश पातळीवर सुरू आहे व विविध पिकातील काही जाती शेतकऱ्यांना उत्पादनासाठी वितरित केलेले आहेत.
शाश्वत शेती
पद्धती-
शेतीमधून मिळणाऱ्या पीक उत्पादनामध्ये सातत्यत्या रहावी यासाठी शेतीमध्ये एकात्मिक अन्नद्रव्यवस्थापन , एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन ,सेंद्रिय शेती ,नैसर्गिक शेती , जैविक शेती ,एस आर आय ,एस आर टी ,कमी मशागत शेती ,शून्य मशागत शेती इत्यादी बाबींचा अवलंब केला जात आहे.
कृषि यांत्रिकीकरण-
कमी वेळेत जलदगतीने व प्रमाणबध्द मशागतीची कामे , पेरणी लागवड आंतरमशागतीची कामे फवारणी काढणे काढणी प्रक्रिया व पॅकिंग इत्यादी कामांसाठी यंत्र व औजारांचा वापर मोठयामाणावर केला जात आहे यामुळे कामे वेळेत होण्याबरोबरच उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होत आहे व मजुर टंचाई या शेतक-याच्या समस्येवर एक प्रभावी तोडगा निघाला आहे. यांत्रिकीकरणासाठी कृषि विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजना कृषि यांत्रिकीकरण योजना उकात्मिक फलोत्पादन योजना उपअभियान अशा विविध योजनांमधुन अनुदान मिळत असल्यामुळे यांत्रिकीकरणाकडे शेतक-यांचा कल वाढत आहे.
विविध शासकीय योजना व धोरणांचे शेतकऱ्यांना पाठबळ -
शेतकऱ्यांना शेतीमधून उत्पादन घेताना महाराष्ट्र शासन कृषि विभाग , केंद्र व राज्य शासनाकडून मिळणा-या अनुदातुन विविध योजनांमधून शेतक-यांना अनुदान दिले जात आहे त्यापैकी प्रमुख योजना पुढील प्रमाणे फळबाग लागवडीसाठी लहान शेतक-यांसाठी महात्मा गांधी फळबांग लागवड योजना तसेच पाच एकरांवरील मोठ्या शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, कृषी यांत्रिकीकरण , पीएमएफ एम ई अंतर्गत प्रक्रियेसाठी अनुदान केंद्र सरकार मार्फत, पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये तर महाराष्ट्र सरकार तर्फे नमो शेतकरी सन्मानमार्फत 6000 रुपये शेतकऱ्याच्या थेट अकाउंट मध्ये जमा केले जात आहेत.
याबरोबरच एक रुपयांमध्ये पिक विमा योजना , हवामान आधारित फळपिक विमा योजना, विविध पिकांसाठी किमान आधारभूत किंमत , कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प , प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत ठिबक व तुषार सिंचनासाठी अनुदान, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेततळ्यासाठी अनुदान , उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेतीसाठी ग्रीन हाऊस, शेडनेट हाऊस तसेच अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत रोपवाटिकेसाठी अनुदान ,शेतकरी शेतीशाळा व शेतकरी प्रशिक्षणासाठी तरतूद व दुर्दैवाने शेतकऱ्याचा किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान त्यांच्या वारसाला दोन लाख रूपये सानुग्रह अनुदान दिले जात आहे.
काढणीपश्चात प्रक्रिया साठवणूक व विक्री -
यामध्ये काढणी झाल्यानंतर किंवा हंगाम संपल्यानंतर बाजारामध्ये एकाच वेळेला जास्त ‘शेतमाल उत्पादन आल्यास उत्पादित शेतीमालाला कमी बाजारभाव मिळतो हे टाळण्यासाठी शासनाने प्रक्रिया व साठवणूक करून नंतर टप्प्याटप्प्याने उत्पादित माल बाजारात आणावा यासाठी शेतकऱ्यांना उत्पादक कंपनीच्या मार्फत गोडाऊनची सुविधा ,प्रक्रिया उद्योगासाठी अर्थसहाय्य ,पॅक हाऊस रायपनिंग चेंबर ,कांदा चाळ ,कोल्ड स्टोरेज इत्यादी गोष्टीसाठी अनुदान दिले जात आहे तसेच विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मेसेज द्वारे बाजारभावाची व बाजारात आवक झालेल्या मालाची माहिती दिली जात आहे
हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर -
सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे दिवसेंदिवस पर्जन्यमान,
तापमान यामध्ये खूप मोठा बदल घडत आहे व या बदलामुळे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी हवामान
अनुकूल शेती तंत्रज्ञान उदाहरणार्थ गादीवाफयावर पिकांची पेरणी किंवा लागवड ठिबक व तुषार
सिंचन चा वापर पिकांसाठी मल्चिंग व क्रॉप कव्हर, प्रतिकूल वातावरणात तग धरणाऱ्या वाणांची
निर्मिती हवामानाचा अंदाज , हवामान आधारित कृषी सल्ला इत्यादी गोष्टी वापरून शेतकऱ्यांना
आपल्या पिकांचे होणारे संभाव्य नुकसान कमी करता येते किंवा टाळता येते.
अशा प्रकारचे विविध सकारात्मक बदल कृषी क्षेत्रात झाल्यामुळे
शेतीमधील उत्पादन वाढ झालेले आहे तसेच देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे एवढेच
नव्हे तर बऱ्याच भाजीपाला ,फळे, मसाला पिके व प्रक्रियायुक्त पदार्थ यांचा सर्वात मोठा
निर्यातदार देश झालेला आहे.
.jpg)





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा