जमीनीतून तसेच बियाण्याव्दारे पसरणारे जीवाणूजन्य/विषाणूजन्य, बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या रोगांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असून बीजप्रक्रिया हे अत्यंत प्रभावी साधन आहे. बियाणे बदल कमी असलेल्या पिकांमध्ये शेतकऱ्यांकडील स्वतःचे बियाणे वापराचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात सन २०२३-२४ मध्ये तूर पिकावर मर रोग, सोयबीन पिकावर मोझेंक या रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला होता.
सदर रोगांमुळे शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणावरील खर्च वाढून पिकाच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे तसेच पर्यायाने उत्पादनही घटत आहे. त्याकरीता बीजप्रक्रिया मोहिमेअंतर्गत अशा शेतकऱ्यांना स्वतःकडील / घरगुती वापरण्यात येणाऱ्या बियाण्यास बीजप्रक्रिया करण्यास प्रोत्साहित करून बीजप्रक्रिया युक्त बियाण्याची जास्त प्रमाणावर पेरणी करणे व बियाण्याव्दारे पसरणारे जीवाणूजन्य/विषाणूजन्य, बुरशीजन्य रोग व किडींचा प्रादुर्भावाला आळा घालणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
बीजप्रक्रिया करण्याचे फायदे:-
१. बियाण्यापासून प्रसारित होणाऱ्या आणि जमिनीत असणाऱ्या बुरशीच्या जिवाणूपासून संरक्षण मिळते.
२. जमिनीत असणाऱ्या किडी व पेरणी पासून ३०-३५ दिवस रस शोषक किडी आणि खोड माशी प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो.
३. कीड व रोग व्यवस्थापनेच्या खर्चात बचत होते.
. बियाण्याची उगवण क्षमता वाढवते. ४
५. जैविक खताच्या प्रक्रियेमुळे जिवाणू झाडांना अन्नद्रव्य लवकर उपलब्ध करून देतात.
६. उत्पादनात वाढ होते.
बीजप्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी:-
१. बीजप्रक्रिया करण्यासाठी हातमोजे, मास्क, चष्मा या सारख्या इतर संरक्षण करणाऱ्या बाबी घालाव्यात.
२. बीजप्रक्रिया तळवटावर किंवा बारदाण्यार किंवा यंत्राद्वारे सावलीत करावी.
३. बियाणे हाताने चोळू नये, कापडाने किंवा पिशवि मध्ये एकत्र मिसळून घ्यावे.
४. रासायनिक आणि जैविक बीजप्रक्रिया एकत्र करू नयेत.
५. जैविक बीजप्रक्रिया ही रसायनिक बीजप्रक्रिया नंतर करावी आणि यामध्ये २.५-३ तासाचे अंतर असावे.
६. बीजप्रक्रिया केलेले बियाणे ३-४ तासाच्या आत पेरणी साठी वापरावे.
७. बीजप्रक्रिया बुरशीनाशक-किटकनाशक-जीवाणू अशा क्रमाने करावी.
बीज प्रक्रियेसाठी लागणारी रासायनिक व जैविक औषधे तसेच जैविक खते याबाबतच्या शिफारसी खालील प्रमाणे आहेत. बियाण्याच्या वजनावरून खाली दिलेले कोणतेही एक बुरशिनाशक, किटकनाशक आणि जीवाणू त्या प्रमाणात घ्यावे.
.jpg)
बुरशीनाशकाची प्रथम त्या नंतर रासायनिक आणि शेवटी जैविक संघाची करावी
उत्तर द्याहटवाप्रथम रासायनिक व नंतर जैविक बिजप्रक्रिया करावी
उत्तर द्याहटवाएकदम बरोबर
हटवारासायनिक बीजप्रक्रिया प्रथम करावी व नंतर जैविक बिजप्रक्रिया करावी
उत्तर द्याहटवाबरोबर
हटवाबुरशीनाशक
उत्तर द्याहटवाYes
उत्तर द्याहटवाआपला नंबर पाठवा
उत्तर द्याहटवासर्व प्रथम रासायनिक बीजप्रक्रिया करून घ्यावी त्या नंतर जैविक ची करावी दोन्ही मध्ये कमीत कमी अडीच ते तीन तासांचे अंतर असावे
उत्तर द्याहटवारासायनिक बीजप्रक्रिया प्रथम करावी व नंतर जैविक बिजप्रक्रिया
उत्तर द्याहटवाहोय.
उत्तर द्याहटवारासायनिक
उत्तर द्याहटवारासायनिक बीज प्रक्रिया अगोदर करावी
उत्तर द्याहटवाजैविक बीजप्रक्रिया ही रसायनिक बीजप्रक्रिया नंतर करावी आणि यामध्ये २.५-३ तासाचे अंतर असावे.
उत्तर द्याहटवाबीजप्रक्रिया बुरशीनाशक-किटकनाशक-जीवाणू अशा क्रमाने करतात.
रासायनिक बीजप्रक्रिया अगोदर आणि नंतर जैविक बीज प्रक्रिया
उत्तर द्याहटवा8208881286
उत्तर द्याहटवारासायनिक बीजप्रक्रिया करून नंतर जैविक बीजप्रक्रिया करावी
उत्तर द्याहटवारासायनिक बीजप्रक्रिया करून नंतर जैविक बीजप्रक्रिया करावी दोघांमध्ये 3 तास अंतर असावे
उत्तर द्याहटवारासायनिक 7020154578
उत्तर द्याहटवा