श्री यशवंत गव्हाणे (कृषी पर्यवेक्षक, सावंतवाडी)
सहाय्यक कृषी अधिकारी, परिवार
सन १९६५ पासून कृषी विभागामार्फत शेतक-यांच्या सेवार्थ दरमहा प्रसिध्द करण्यात येत असून या मासिकामध्ये कृषी विद्यापीठाचे तज्ञ आणि कृषी व संलग्न खात्याचे अधिकारी यांचे लेख तसेच कृषी क्षेत्रात काम करणा-या संस्था आणि कृषी क्षेत्रातील प्रगतशील शेतकरी यांच्या यशोगाथा प्रसिध्द करण्यात येतात. बदलत्या काळाची गरज ओळखून शेतीसंबंधी इतर पुरक व्यवसाय, बाजार व्यवस्थापन, कृषीप्रक्रिया, निर्यातक्षम शेतीसाठी महत्वाचे निकष, राष्ट्रीयकृत बँका मार्फत देण्यात येणाऱ्या सुविधा/ मदती बाबतची माहिती तसेच कृषी व संलग्न विभागाच्या विविध योजना इत्यादी माहिती प्रसिध्द करण्यात येते. राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषीविषयक झालेले संशोधन वेळोवेळी या मासिकाच्या माध्यमातून दरमहा उपलब्ध करुन देण्यात येते.
मासिकाची वर्गणी:
शेतकरी मासिकाची वार्षिक वर्गणी रुपये ४००/तर द्विवार्षिक वर्गणी रूपये ८००/- राहील तर किरकोळ अंकाची किंमत कपये ३५ आहे .मासिकाची वार्षिक व्दिवार्षिक वर्गणी रक्कम शेतकरी मासिक कार्यालयात रोखीने भरता येणार नाही. वर्गणीची रकम क्षेत्रीय कार्यालयाकडून कोषागार चलनाने किंवा ग्रास प्रणालीमार्फतच स्वीकारली जाते तसेच वैयक्तिक शेतकरी वर्गणी मनीऑर्डरव्दारे शेतकरी मासिक कार्यालयास पाठवू शकतात.
सन २०१३-१४ बा वर्षापासून संगणकीय ग्रासप्रणालीतून (Government Receipts Accounting System- GRAS) महसूल जमेची
रक्कम ऑनलाईन पध्दतीने भरण्याची कार्यपध्दती विकसित करण्यात आली आहे. ऑनलाईन पध्दतीने वर्गणी भरताना पुढील प्रमाणे वर्गणी भरता येते.
1. Intermet Banking (नेट बैंकिंग) अथवा डेबिट व क्रेडीट कार्ड मार्फत
2. Accross Bank Counter सर्व बँक , चलन बँकेत भरायचे असल्यास पर्याय निवडावा
3. UPI ने भरायचे असल्यास UPI ID टाकून वर्गणी भरता येईन, उदा. Phone Pay, Google Pay
त्यानुसार वर्गणीदारांनी GRAS प्रणालीव्दारे वर्गणी भरणा करून चलनाची प्रत व पत्त्यांची वावी पिनकोड सह शेतकरी मासिक कार्यालयास agrishetkari@gmail.com या ईमेल-आयडीवर अथवा पोस्टाने पाठवावी
कार्यालयाचा पत्ता-शेतकरी मासिक, समिती सभागृह दूसरा मजला, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे ४११००५) पाठवावी कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना संबंधित वर्गणीदाराने त्यांचा सभासद क्रमांक व वर्गणीचा कालावधी नमूद करणे आवश्यक राहील, तसेच कोषागार चलनाची मुळप्रत पाठवणे .वर्गणीदार होण्यासाठी शेतकरी मासिक अंकाच्या मनावरील QR कोड Scan करावा .
जाहिरात -
शेतकरी मासिकामध्ये शासकीय स्वरुपाच्या जाहिराती स्विकारण्यात येतात. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत जाहिराती प्राप्त झाल्यास पुढील महिन्याच्या अंकामध्ये प्रसिद्धीसाठी सदरच्या जाहिरातींचा समावेश करण्यात येईल, तसेच जाहिरात देण्यापूर्वी शेतकरी मासिक कार्यालयास (०२०-२५५२७३३१) या दूरध्वनीवर संपर्क साधावा, जाहिरातीचे आर्टवर्क आकारानुसार पी.डी.एफ. फॉरमॅट मध्ये agrishetkari@gmail.com या इ-मेल वर पाठवावे शासनाने शेतकरी मासिकामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे दर निश्चित केलेले आहेत
#शेतकरीमासिक #कृषी #शेती #महाराष्ट्र #भारत #कृषीविज्ञान #तंत्रज्ञान #यशस्वीशेती #किसान #अन्नधान्य #उत्पन्न #बाजारपेठ #जाहिरात