१३ जून २०२४

सिलिकॉन : पिकांसाठी फायदेशीर अन्नघटक

 



प्रा . दिवाकर डांगे  मो. नंबर ९६२३५९९२२४ 

स्कूल ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेस, जी . एच.  रायसोनी युनिवर्सिरी, सायखेडा  (एम. पी. )

श्री . अक्षय सुनिल ढेंगळे 

आचार्य पदवी विद्यार्थी कृषि विस्तार शिक्षण विभाग डॉ . पं . दे.  कृ . अकोला

पिकांच्या आवश्यक अत्रघटकामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन सोबतच प्राथमिक अन्नघटके नत्र, स्फुरद व पालाश, द्वितीय अन्नघटक कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर तर सूक्ष्म अन्नघटकांमध्ये लोह, मॅगनीज , बोरॉन, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम, क्लोरीन इत्यादींचा समावेश होतो याशिवाय आणखी काही अञ्जघटकांची पिकांना आवश्यकता असते. त्यामध्ये सिलीकॉन (Si) ची उपयुक्तता सिद्ध झाली असून सिलीकॉन करिता आंतरराष्ट्रीय स्तरावर फायदेशीर अनघटक असे नामाभिधान प्राप्त झाले आहे


          सिलीकॉन हा जमिनीतील वाळू आणि मृत्तिकेत विपूल प्रमाणात आढळून येणारा घटक आहे. तो संयुगावस्थेत आढळतो. सिलीकॉन (Si) हे नैसर्गिक रासायनिक तत्व आहे तर सिलीका, सिलीकॉन डायऑक्साईड (SiO₂) हे संयुग असून त्यामध्ये सिलीकॉन आणि ऑक्सिजनचा समावेश असतो. कॅल्शियम सिलीकेट (CaSiO,), मॅग्नेशियम सिलीकेट , सोडीयम सिलीकेट , पोटॅशियम सिलीकेट इत्यादी स्वरूपातही सिलीकॉन जमिनीत आढळतो. जमिनीत साधारणतः तिच्या वजनाच्या ३०% प्रमाणात सिलीकॉन असतो. परंतु त्यापैकी बराचसा सिलीकॉन पाण्यात न विरघळणान्या खनिजांमध्ये बंदिस्त असतो.

           पिकाच्या वाढीच्या व पिकांच्या ओराग्याच्या दृष्टिकोनातून विद्राव्य आणि उपलब्ध स्वरुपातील सिलीकॉन हा ‘सिलिसीक अॅसिड (Si4COH4,) किंवा ‘मोनो मिलिसीक अॅसिड (H4,SiO3,) च्या रूपात पिकांची मुळे शोषून घेतात. पिकांच्या वा ढीवर व उत्पादन क्षमतेवर सिलीकॉन चा फायदेशीर परिणाम होतो. 

पिकांच्या मुळ्यांनी सिलिसिक अॅसिडच्या स्वरूपात शोषून घेतल्यानंतर तो वनस्पतीच्या पेशींमध्ये साठविला जातो. विशेषतः पेशीभित्तीका आणि दोन पेशींतील जागेत धन सिलीका संचित केल्या जाते. त्यामुळे पेशी कमालीच्या ताठर होतात. रोग व कीड प्रतिकार क्षमता निर्माण होते. सिलीकॉन हा वनस्पतीचा असा एकमेव अन्नघटक आहे की ज्याचे वनस्पतीमध्ये खूप जास्त शोषण व संचय झाला तरी त्याचा विपरित परिणाम होत नाही. 

नैसर्गिकरित्या उपलब्ध स्वरुपातील सिलीकॉन जमिनीत कमी- अधिक प्रमाणात असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीत व वेगवेगळ्या परिस्थितीत त्याचे प्रमाण १% पेक्षा कमी ते ४५% पर्यंत असते. सर्व पिक सिलीकॉनचा अतिरिक्त पुरवठा केल्यावर उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून उत्तम प्रतिसाद देतात. सिलीकॉन वरील अनेक संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की, पिकांना उपलब्ध स्वरूपातील सिलीकॉन (Si) पुरविल्यास पिकांवरील रोग, कीड इत्यादींना प्रतिबंध होतो. 

तसेच, वातावरणातील बदलांमुळे पिकावर येणारा ताण सहन करण्याच्या क्षमतेसह उत्पादनात भरपूर वाढ होते. म्हणूनच सिलीकॉन या वनस्पतीच्या अन्नघटकाची गणना वनस्पतीशास्त्रात “फायदेशीर अन्नघटक” अशी केलेली.

 पिकांसंदर्भात सिलीकॉनचे फायदे:- 

१) पिकांची जोमदार, कणखर व काटक वाढ होणे.

२) जिवाणू आणि बुरशीमुळे होणाऱ्या रोगांना आळा बसतो. भुरी रोगाच्या बाबतीत पिकात नैसर्गिक प्रतिकार क्षमता तयार होते.

३) पिकांत कीड प्रतिकार क्षमता निर्माण होते.

४) पिकांची वातावरणातील बदलांमुळे निर्माण होणारा ताण सहन करण्याची क्षमता वाढते.

५) फुलांचा चांगला विकास होऊन परागीकरणाला चालना मिळते.

६) जमिनीचा सामू (pH) नियंत्रित करते.

७) जमिनीतील विषारी घटकांचे निरसन करते.

८) इतर अत्रघटकांचा संतुलित पुरवठा होण्यास मदत करते.

९  )जमिनीचे भौतिक गुणधर्म जसे सच्छिद्रता बाढविणे, हवा खेळती राहणे इत्यादींना चालना मिळते.

१०) जमिनीची जलधारणाक्षमता वाढते.

११) जमिनीची सुधारणा घडून येते

१२) दर्जेदार उत्पादनात वाढ होते. रेताड, हलक्या प्रतिच्या तसेच, धूप झालेल्या जमिनीत सिलीकॉनचे प्रमाण फारच कमी असते. सिलीकॉन हा सेंद्रिय द्रव्याचा प्रमुख घटक नसल्यामुळे भरपूर सेंद्रिय द्रव्य असलेल्या जमिनीतही सिलीकॉन ची कमतरता असते. 


सिलीकॉनच्या कमतरतेमुळे पिके अशक्त राहून त्यांची वाढ, विकास व प्रजनन वा बाबतीत विकृती निर्माण होण्याची शक्यता बळावते. म्हणून सर्वच प्रकारच्या जमिनीत सिलीकॉनचा वापर केल्यास जमिनीला व पिकाला फायदा होऊन भरपूर दर्जेदार उत्पादन घेण्यास वाव   निर्माण होतो.

धान, ऊस, गहू, मका, चणा, कापूस,  सोयाबीन, कोहळे, काकडी, कोबी इतर भाजीपाला, संत्रा, मोसंबी इतर फळबागा, फुलबागा तसेच सर्वच पिकाना सिलीकॉनचा फायदा होतो. 

पिकाचे अवशेष, कंपोस्ट तसेच गव्हाचे कुटार, धानाचे तणस यामध्ये सिलीकॉन असतो. परंतु त्यामधील सिलीकॉन विद्राव्य स्वरूपात येण्यास व पिकांना उपलब्ध होण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागतो. पिकांना फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून विद्राव्य स्वरूपाचा सिलीकॉन शेतात देणे फायदेशीर आहे. सिलीकॉन (Si) युक्त कृषी उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. 

तेव्हा सर्व शेतकरी बांधवाणी तसेच सर्व संबधितानी सिलिकॉनचे शेतातील महत्व समजून घेऊन त्याचा वापर करून फायदा करून घ्यावा .

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा