२. सेंद्रिय शेती शाश्वतता, जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधन संवर्धन या तत्त्वांवर आधारलेली आहे.
३. सेंद्रिय शेतीमध्ये कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी नैसर्गिक पद्धतींचा वापर केला जातो, पिक फेरपालट, आंतरपीक लागवड, सापळा पिकांची लागवड आणि नैसर्गिक भक्षकांचा वापर.
४. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीतील कार्बनचे क्रेडिट होऊन हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होते.
५. सेंद्रिय शेतीमुळे नैसर्गिक खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य व सुपीकता सुधारण्यास मदत होते.
६. सेंद्रिय शेतीमुळे ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या तंत्राचा वापर करून पाण्याची बचत होण्यास मदत होते.
७. सेंद्रिय शेतीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊन एक प्रकारे अर्थव्यवस्थेस चालना मिळते.
९. सेंद्रिय शेतीमुळे कृत्रिम कीटकनाशके आणि खतांचा वापर कमी होतो, त्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर होणारा वाईट परिणाम टाळण्यास मदत होते.
९. सेंद्रिय शेतीमुळे विविध प्रकारच्या वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींना अधिवास उपलब्ध होण्यास मदत होऊन जैवविविधतेला चालना मिळू शकते.
१०. सेंद्रिय शेतीमुळे उच्च गुणवत्तेचे, पौष्टिक अन्न तयार होते ते हानिकारक रसायनापासुन मुक्त असते.
.png)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा