१० मे २०२४

10 टिप्स रासायनिक खतांचा कार्यक्षम वापरासाठी

पिकांच्या जोमदार वाढीसाठी आणि भरघोस उत्पादन मिळण्यासाठी रासायनिक खते आवश्यक आहेत परंतु त्यांच्या अयोग्य वापरामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होऊ शकतात. हरितक्रांतीनंतर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. त्याचे दुष्परिणाम जमीन पाणी निसर्ग मानवी आरोग्य इत्यादी अनेक ठिकाणी दिसून येत आहेत रासायनिक खतांचा सुयोग्य वापर केला तर त्यांचे दुष्परिणाम आपण टाळू शकतो. रासायनिक खतांचा अवाजवी वापरण्याकरता शिफारशी केल्याप्रमाणे उपयोग केल्यास अधिक फायदेशीर होतो. रासायनिक खतांचा वापर करताना पुढील काही मुद्द्यांच्या आधारे करता येईल. 1 माती परीक्षण पिकांची लागवड करण्यापूर्वी मातीमधील उपलब्ध अन्नद्रव्यांचे निश्चित करण्यासाठी मातीची तपासणी करणे गरजेचे आहे माती परीक्षण अहवालानुसार खतांचा योग्य प्रकार आणि प्रमाण निश्चित करून त्याचा वापर करता येतो. यामुळे खर्चात तर बचत होतेच शिवाय अवाजवी वापर टाळाला जातो. 2 योग्य मात्रा पिकांना जास्तीत जास्त अन्नद्रव्य मिळावेत यासाठी खतांचा समान व योग्य वेळी वापर करणे गरजेचे आहे यासाठी शिफारशीत केलेल्या खतांच्या मात्रा अभ्यास करून त्याप्रमाणे खते द्यावीत. खतांच्या अतिरिक्त वापरामुळे मातीत दिलेली खते निचरा होऊन पाण्यासोबत भूगर्भात जातात व पर्यावरणीय प्रदूषण वाढते 3 सेंद्रिय खतांचा वापर कंपोस्ट खत , हिरवळीचे खते हाडांची खते इत्यादी प्रकारची सेंद्रिय खते रासायनिक खतांना उत्तम पर्याय आहेत. यांच्या वापरामुळे पिकांना अन्नद्रव्य उपलब्ध होतात शिवाय जमिनीची आरोग्य आणि स्वच्छता वाढण्यास मदत होते. 4 पिक फेरपालट रासायनिक खतांचा कार्यक्षम आणि प्रभावी वापर होण्यासाठी पिक फेरपालट प्रभावी मार्ग आहे. पिकांची फेरफलट केल्यामुळे नैसर्गिकरीत्या जमिनीतील पोषक द्रव्य वाढण्यास मदत होते त्यामुळे रासायनिक खतांची गरज कमी होते. 5 अच्छादक पिकांची लागवड भुईमूग सारख्या आच्छादक पिकामुळे जमिनीतील नायट्रोजन स्थिर होऊन नायट्रोजन युक्त खतांची गरज कमी होते अशा प्रकारची पिके मातेचे धूप थांबण्यास आणि मातीची रचना सुधारण्यास मदत करतात. 6 स्लो रिलीज खतांचा वापर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रासायनिक खतांमध्ये मोठे बदल झाले असून खत जमिनीत दिल्यानंतर त्यातील अन्नद्रव्य हळूहळू पिकांना उपलब्ध होतात यांनाच स्लो रिलीज खते असे म्हटले जाते. 7 साठवणूक व हाताळणी लहान मुले पाळीव प्राणी इत्यादी पासून रासायनिक खते दूर कोरड्या ठिकाणी साठवायला हवीत. यामुळे खतांचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते. 8 उत्पादकांच्या सूचना प्रत्येक रासायनिक खत उपयोग करताना हाताळताना तसेच साठवणूक करताना त्यांच्या उत्पादकाने काही सूचना दिलेल्या असतात त्याचा काटकरपणे वापर केल्यास खतांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा